शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यात गरिबांना मिळणार 1 रुपये किलो तांदूळ अन् नववधूला 1 तोळे सोने फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:34 IST

आसाम सरकारनं पुढच्या वित्त वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे.

ठळक मुद्देआसाम सरकारनं पुढच्या वित्त वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही कपात करण्यात आली आहे.

गुवाहाटी- आसाम सरकारनं पुढच्या वित्त वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी सादर केलेल्या विधानसभा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पात होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही कपात करण्यात आली आहे. विधवा आणि दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च शिक्षण मिळण्यासाठी काही योजनांची घोषणाही करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात स्वस्त पोषण आहार सहाय्यता योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्याअंतर्गत 53 लाख लाभार्थी कुटुंबीयांना खाद्य सुरक्षेंतर्गत तीन रुपयांऐवजी प्रतिकिलो एक रुपयानं तांदूळ मिळणार आहेत. अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले, आसाममधल्या सर्व समुदायाच्या नववधूंना एक तोळे सोनं दिलं जाणार असून, त्याची अंदाजे किंमत 38 हजारांच्या घरात आहे. शिक्षणासाठी सरकार कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकं पुरवणार आहे. जी सध्या 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत होती. सरकारी कॉलेज आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार असून, मेस बिलमध्ये 10 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपात 700 रुपये दिले जाणार आहेत.चहा बागायत क्षेत्रातील चार लाख कुटुंबांना मोफत तांदूळ पुरविण्यात येणार आहे. तसेच चहा बागायत क्षेत्रातील मजुरांच्या कुटुंबीयांना दोन रुपये किलोनं साखर देण्यात येणार आहे. 45 वर्षांच्या महिलेच्या पतीचं निधन झाल्यास तिच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतीच्या स्वरूपात 25 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच त्या पत्नीला 60 वर्षांच्या वयोमर्यादेपर्यंत प्रतिमहिना 250 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 60 वर्षांच्या नंतर त्या महिलेला वृद्धावस्थेतील पेन्शनचाही लाभ मिळणार आहे. अल्पसंख्याक समुदायातील मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Assamआसाम