शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 06:35 IST

तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल.

कोलकाता : तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल. खग्रास ग्रहणाच्या काळात पृथ्वीच्या छायेने झाकोळलेल्या चंद्रबिंबावर काही ठिकाणी फिकट नारिंगी ते काही ठिकाणी गडद लाल-तपकिरी लालिमा दिसत असल्याने खगोलप्रेमींना या अस्मानी घटनेची ‘ब्लड मून’ म्हणूनही प्रतीक्षा असते.येथील एम. पी. बिर्ला मूलभूत संशोधन संस्था व नक्षत्रालयाचे संशोधन संचालक देवीप्रसाद दुराई यांनी या ग्रहणाचा तपशील व वैशिष्ट्ये विशद केली.या चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती एक तास ४३ मिनिटांची असेल. याशिवाय सुरुवातीस व नंतर ग्रहण सुटेपर्यंत मिळून आणखी तासभर चंद्रबिंब खंडग्रास अवस्थेत दिसेल.२७ जुलै रोजी रा. ११.५४ वाजता ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. २८ जुलैच्या पहाटे १ ते २.४३ या वेळात खग्रास ग्रहण असेल. पहाटे १.५२ या क्षणी चंद्र सर्वाधिक काळवंडलेला असेल. त्यानंतर मोक्षकाळ सुरू होऊन २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. म्हणजेच संपूर्ण ग्रहणकाळ जवळपास चार तासांचा असल्याने एरवी महिनाभरात दिसणाऱ्या चंद्राच्या सर्व कला अभ्यासकांना मनसोक्त पाहता येतील. (वृत्तसंस्था)याआधीचे खग्रास चंद्रग्रहण यंदाच्या १८ जानेवारी रोजी झाले होते, पण भारतातून ते दिसले नव्हते. आगामी खग्रास ग्रहण भारताखेरीज दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत तसेच आफ्रिका व पश्चिम आणि मध्य आशियातील बहुतांश ठिकाणी दिसेल.पुढील वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण १९ जानेवारी रोजी जगाच्या निवडक भागांतून दिसेल. मात्र त्या वेळी चंद्राचे भ्रमण पृथ्वीच्या छायेच्या उत्तरेकडे होणार असल्याने त्या दिवशी खग्रास ग्रहणाचा काळ तुलनेने कमी म्हणजे एक तास दोन मिनिटांचा असेल.

टॅग्स :Lunar Eclipse 2018चंद्रग्रहण 2018