शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:20 IST

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने गुरुवारी २ सरकारी डॉक्टरांना निलंबित केले. या २ डॉक्टरांनी जे कृत्य केले ते ऐकून कुणाचाही संताप अनावर आहे. दोन्ही डॉक्टरांनी २००९ मध्ये शोपियात बुडून मृत पावलेल्या २ युवा काश्मिरी मुली आसिया जान आणि नीलोफर जान यांचा बनावट पोस्टमोर्टम रिपोर्ट बनवला होता. या मुलींचा बुडून नव्हे तर बलात्कारानंतर मृत्यू झाल्याचे त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं. या प्रकरणानंतर जम्मू काश्मीरसह देशात हाहाकार माजला. 

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता या २ डॉक्टरांनी केलेले कृत्य सगळ्यांसमोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून दोघांनी हे षडयंत्र रचले होते. दोन्ही डॉक्टरांनी मुलींच्या मृत्यू  रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर हत्या दाखवून धार्मिक दंगली आणि काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा डाव होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. 

सीबीआयनं आसिया-नीलोफर प्रकरणाचा तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआयच्या तपासात आढळले की, डॉक्टरांनी पोस्टमोर्टम रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला होता. एम्स आणि सेंट्रल फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षावरून या मुलींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे आढळले. त्याचसोबत पाण्यात बुडण्यापूर्वी मुलींवर कुठलाही अत्याचार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली पाण्यात बुडाल्याने नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर कुठेही बलात्कार आणि बळजबरी केल्याचे पुरावे सापडले नाही. 

पाकिस्तानी एजेन्सीसाठी करत होते कामडॉ. निघत शाहीन चिलू एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्या चाडुरा, बडगाम इथं उपजिल्हा रुग्णालयात तैनात असतात. डॉ. बिलाल अहमद दलाल, वैद्यकीय अधिकारी आहेत. हे दोघेही शोपिया सरकारी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही पाकिस्तानी एजेन्सीसाठी काम करत असल्याचे सीबीआय तपासात उघड झाले. 

काश्मीरमध्ये भडकली होती हिंसाया दोन्ही डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट बनवत दोन्ही महिलांसोबत बलात्कार आणि हत्या झाल्याचं सांगितले. हे भारताविरोधात एक षडयंत्र होते. दोन्ही डॉक्टरांची त्यात महत्त्वाची भूमिका होती. १७ वर्षीय आसिया जान आणि २२ वर्षीय नीलोफर जान यांच्या बलात्कार आणि हत्येच्या खोट्या बातमीनं काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. त्यानंतर अनेक भागात जमावाचा आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापट झाली होती. या घटनेनंतर अनेक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. 

६ हजार कोटींचे झाले नुकसानकाश्मीर हिंसाचारात ४२ ठिकाणी बंदचे आवाहन केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. ३५ पोलीस, निमलष्करी दलातील जवानांसह १३५ लोक जखमी झाले होते. या काळात ६ हजार कोटींचे नुकसान झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर