शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Stambh: अशोक स्तंभाच्या डिझाइनमध्ये बदल करता येतो? कायदा काय सांगतो, जाणून घ्या 

By बाळकृष्ण परब | Updated: July 13, 2022 10:03 IST

Ashok Stambh Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण नुकतंच केलं. मात्र या अनावरणानंतर अशोक स्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून वादाला तोंड फुटले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण नुकतंच केलं. मात्र या अनावरणानंतर अशोक स्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून वादाला तोंड फुटले आहे. अशोक स्तंभाच्या मूळ डिझाइनमध्ये बदल करून हा अशोक स्तंभ तयार करण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे. मूर्तीकारांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत अशोक स्तंभावरील डिझाईनबाबत कायदा काय सांगतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. भारत सरकार राष्ट्रीय प्रतीक चिन्हांमध्ये बदल करू शकते का? याचं उत्तर भारतीय राष्ट्रीय चिन्ह अॅक्ट २००५ मध्ये आहे. नंतर हा कायदा २००७ मध्ये अपडेट करण्यात आला होता.

या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताच्या अधिकृत राष्ट्रीय प्रतीकाला अधिकृत मोहोर म्हणून वापरण्यासाठी अनुसूचीमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतीक हे सारनाथ येथील अशोकस्तंभावरून प्रेरित आहे. या कायद्याच्या सेक्शन ६(२0)(एफ)मध्ये सरकार राष्ट्रीय प्रतीकांच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते, असा उल्लेख आहे.

सेक्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, गरज भासल्यास केंद्र सरकारजवळ आवश्यक वाटेल तो बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रतीकांच्या डिझाइनमध्ये बदल करण्याच्या अधिकाराचाही समावेश आहे. मात्र या कायद्यानुसार केवळ डिझाइनमध्येच बदल करता येतो. कधीही पूर्ण राष्ट्रीय प्रतीक बदलता येत नाही.

याबाबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील संजय घोष यांनी सांगितले की, २००५ च्या कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय प्रतीकांच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते. मात्र ही प्रतीके भारताच्या लोकशाहीचा प्रमुख भाग आहेत. त्यांची एक वेगळी ओळख आहे. अशा परिस्थिती सरकार कधीही काही बदलण्याचा निर्णय घेणार असेल तर तो पूर्ण काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतParliamentसंसद