नवी दिल्ली - लग्नानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असणं सध्याच्या काळात नवीन नाही. भारतात दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. त्यातच यंदा समोर आलेल्या रिपोर्टने सगळ्यांना हैराण केले आहे. या यादीत ज्या शहराचं नाव सर्वात टॉपला आहे त्याच्या नावाचा कदाचितच कुणी विचार केला असेल. दिल्ली, मुंबईसारख्या शहरालाही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये या शहराने मागे टाकले आहे.
हे शहर दक्षिण भारतातील तामिळनाडू येथे आहे. मागील वर्षी मुंबई शहर या यादीत नंबर १ वर होते. परंतु यंदा मुंबईचं नाव टॉप २० शहरांच्या यादीतही नाही. गेल्यावेळी दिल्लीचे नाव दुसऱ्या स्थानावर होते परंतु यावेळी या यादीत दिल्लीचा नंबर ९ व्या क्रमांकावर आला आहे. डेटिंग वेबसाईट Ashley Madison ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये कांचीपुरम १७ व्या क्रमांकावर होते. परंतु २०२५ मध्ये अचानक या शहराने नंबर १ चं स्थान मिळवले आहे. याठिकाणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स प्लॅटफॉमवर साइनअप करणाऱ्या यूजर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे.
ही यादी पाहा
कांचीपुरमसेंट्रल दिल्लीगुरुग्रामगौतम बुद्धनगर साऊथ वेस्ट दिल्लीदेहारादूनईस्ट दिल्लीपुणेबंगळुरूसाऊथ दिल्लीचंदीगडलखनौकोलकातावेस्ट दिल्लीकामरूम(आसाम)नॉर्थ वेस्ट दिल्लीरायगडहैदराबादगाजियाबाद जयपूर
कायदा काय सांगतो?
विवाह्यबाह्य संबंध आता गुन्हा नाही - सु्प्रीम कोर्टाने २०१८ मध्ये आयपीसी ४९७ असंविधानिक घोषित करत वयस्कांमध्ये सहमतीने नातेसंबंध बनणे गुन्हा मानला जाऊ शकत नाही. परंतु हे घटस्फोटाचे एक कारण बनू शकते. कोर्टात हा मानसिक क्रूरता म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते. Ashley Madison ची चीफ स्ट्रॅटर्जी अधिकारी पॉल किएबल म्हणाले की, भारतात विवाहबाह्य संबंध लपवण्यासारखी गोष्ट नाही. याठिकाणी नात्याबाबत लोक उघडपणे बोलू लागलेत. त्यात केवळ लैंगिक संबंध नाही भावनिक एकटेपणाही दूर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे जोडप्यांवर नाही तर मुलांवर परिणाम होत आहे. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.