दीपासोबत एशियाडमध्ये खेळण्यास आशिष उत्साहित
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
नवी दिल्ली: भारताचा आघाडीचा जिम्नॅस्टिक आशिषकुमार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दीपा करमाकरसोबत 19 सप्टेंबरपासून कोरियामध्ये होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाण्यापूर्वी अनुभवाची देवाण घेवाण करण्यासाठी उत्साहित झाला आह़े ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये 2010 आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आशिष चुकीच्या लँडींगमुळे वॉल्ट स्पर्धेच्या अंतिम स्थानावर राहिला होता तर दीपा वॉल्टमध्ये तिसर्या स्थानावर ...
दीपासोबत एशियाडमध्ये खेळण्यास आशिष उत्साहित
नवी दिल्ली: भारताचा आघाडीचा जिम्नॅस्टिक आशिषकुमार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दीपा करमाकरसोबत 19 सप्टेंबरपासून कोरियामध्ये होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाण्यापूर्वी अनुभवाची देवाण घेवाण करण्यासाठी उत्साहित झाला आह़े ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये 2010 आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आशिष चुकीच्या लँडींगमुळे वॉल्ट स्पर्धेच्या अंतिम स्थानावर राहिला होता तर दीपा वॉल्टमध्ये तिसर्या स्थानावर होती़ यामुळे महिला जिम्नॅस्टिकमध्ये भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळू शकले आणि ती स्टार बनली़ अलाहाबादच्या आशिषने दीपाचे कौतुक करताना म्हटले की, दीपाचे ग्लास्गोमध्ये कांस्यपदक जिंकणे निश्चितपणे जिम्नॅस्टिकसाठी सकारात्मक होत़े यामुळे महिला जिम्नॅस्टिकमध्ये तरबेज नाहीत अशी धारणा मोडीत निघाली़ आता अचानक लोक भारताच्या महिला जिम्नॅस्टिकवरदेखील लक्ष केंद्रीत करीत आहेत आणि त्यांना संधी देत आहेत़ यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जाण्यापूर्वी पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य आपल्या पदरी पाडून ते प्रेरणादायी असल्याचे मानत आह़े