शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आसारामची संपत्ती किती आहे, माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:53 IST

संपत्तीचा आकडा पाहून चक्रावून जाल

अहमदाबाद: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या आसाराम जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. सकाळपासूनच आसारामचे भक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. खुद्द आसारामदेखील न्यायालयात हरि ओमचा जप करत होता. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. स्वयंघोषित संत असलेल्या आसारामचे अनेक आश्रम आहेत. 2013 मध्ये आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे. आसारामकडे जवळपास 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती 2014 मध्ये गुजरात पोलिसांनी दिली होती. संपत्तीच्या मूल्याचा हा आकडा 2014 मधील असल्यानं आता त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 10 हजार कोटींच्या संपत्तीत आसारामनं देशभरात घेतलेल्या जमिनींचा समावेश नाही. सूरत पोलिसांच्या माहितीनुसार, आसारामच्या आश्रमांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं सापडली. यामधून आसारामच्या आश्रमाची बँक खात्यांमधील रक्कम आणि गुंतवणूक 9 हजार ते 10 हजार कोटी रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये आसारामच्या जमिनीचा समावेश नव्हता. एकट्या गुजरातमधील 10 जिल्ह्यांमध्ये आसारामच्या 45 ठिकाणी जमिनी आहेत. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील आठ जिल्ह्यांमधील 33 ठिकाणी आसारामची जमीन आहे. आयकर खात्याच्या सूरतमधील विभागानं आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईची अडीच हजार कोटींची संपत्ती उजेडात आणली होती. या संपत्तीचा उल्लेख कोणत्याही सरकारी कागदपत्रांमध्ये आसारामनं केलेला नव्हता. आसारामच्या अहमदाबादमधील आश्रमातील 42 बॅगांमध्ये सापडलेल्या काही कागदपत्रांमधून आयकर खात्यानं अडीच हजार कोटींची संपत्ती शोधून काढली होती. यानंतर आयकर विभागानं आसाराम आणि त्याच्या मुलाकडून 750 कोटींचा दंड वसूल केला होता.  

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूRapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळ