जयपूर - राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसारामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे.मंगळवारी रात्री आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीचा तासभर कारागृहातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे आसाराम याने गुडघ्याचा त्रास होत असल्याचे तसेच रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तसेच अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले.
तुरुंगवासात असलेल्या आसाराम बापूची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
By बाळकृष्ण परब | Updated: February 17, 2021 07:48 IST