शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Asaram Case Verdict : बलात्कारप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 08:21 IST

आसाराम बापूसह तीन आरोपींना जोधपूर कारागृह विशेष कोर्टाने ठरवलं दोषी. कोर्टानंं त्याला ज्नठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 जोधपूर-  अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टाने बुधवारी (ता. 25एप्रिल)रोजी दोषी ठरवत आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टामध्ये आसारामला रडू कोसळले. 

जोधपूर मध्यवर्ती कारागृह कोर्टाने आसाराम बापूसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे तर दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम, शिल्पी व शरदचंद्र या तिघांना कोर्टाने दोषी ठरवंल आहे. प्रकाश व शिवा या दोघांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर शिल्पी आणि शरद या दोषींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

 

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाने समाधानी आहोत. आमच्या लढल्याला यश आलं असून आमच्या बाजूने निर्णय आला आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. 

कोर्टाच्या निर्णयावर आम्ही आमच्या टीमकडून कायदेशीर सल्ला घेऊनच पुढची दिशा ठरवणार आहोत. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं आसारामच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी म्हटलं आहे. 

31 ऑगस्ट 2013 पासून आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहे. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती. इंदूरहून अटक झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आलं. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. 

आसाराम बापूचं वय सध्या 77 आहे. पॉक्सो व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आसाराम बापूवर गुन्हे दाखल आहे. तुरुंगात गेल्यापासून त्याने 12वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. पण आसारामला जामीन मिळाला नाही. 12 पैकी सहा जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळले, तीन अर्ज राजस्थान हाय कोर्टाने फेटाळले आणि तीन सुप्रीम कोर्टाने फेटाळले होते. 

 

 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू