शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:27 IST

सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

हैदराबाद : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काहीही झाले तरी कोणतीच कागदपत्रे दाखविणार नाही. छातीवर गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे. मात्र, देश सोडणार नाही, मी भारतातच राहणार, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.

हैदराबादमध्ये रविवारी सीएए आणि एनआरसी विरोधात एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात जे आवाज उठवतील, त्यांना खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद म्हटले जाईल...मी देशात राहणार, कागद दाखविणार नाही. जर कागद दाखविण्याची वेळ येईल, त्यावेळी छाती दाखवीन आणि सांगेन गोळ्या घाला. छातीवर गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे. कारण, भारताबद्दल माझ्या मनात प्रेम आहे."

दरम्यान, सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. 

मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी द्या -  अकबरुद्दीन ओवेसी एमआएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा सरकारकडे हैदराबाद शहरातील मंदिर आणि एका मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. त्यावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. एका सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, ओवेसी यांनी रविवारी प्रगती भवन येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात शहरातील सिंहवाहिनी महाकाली मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपये आणि अफलजगंज मशिदीच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक