शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Asaduddin owaisi : असदुद्दीन ओवेसींनी मंगळसूत्र आणि कुंकवाशी केली हिजाबची तुलना, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 19:43 IST

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजपने विनाकारणच हा मुद्दा बनवला आहे. खरे तर हा मुलींच्या पसंतीचा मुद्दा आहे.

हिजाबवरील बंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे एकमत न झाल्याने आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठविण्यात येणार आहे. यातच हिजाबवरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. आम्हाला आशा होती, की सर्वोच्च न्यायालयाकडून एकमताने हिजाबच्या बाजूने निर्णय येईल. मात्र, न्यायाधिशांचे एकमत होऊ शकले नाही, आम्ही याचा आदर करतो. जस्टिस धूलिया म्हणाले, की चॉइस एक मोठी गोष्ट आहे आणि याचा सन्मान व्हायला हवा. त्यांनी आर्टिकल 14 आणि 19 चा उल्लेख करत त्यांनी आपला निर्णय लिहिला आहे.

मंगळसूत्र, कुंकू आणि पगडीशी केली हिजाबची तुलना - असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजपने विनाकारणच हा मुद्दा बनवला आहे. खरे तर हा मुलींच्या पसंतीचा मुद्दा आहे. ओवेसी यांनी एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना हिजाबची तुलना पगडी, कुंकू आणि मंगळसूत्रासोबत केली. "जर आपण युनिफॉर्ममध्ये एखाद्या शिख मुलाला पगडीची परवानगी देता आणि हिंदू मुलीला कुंकू लावायची आणि मंगळसूत्राची परवानगी देता, पण मुस्लीम मुलींना हिजाबची परवानगी मिळत नसेल तर हा भेदभाव आहे," असे ओवेसींनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जर मुलांनी एकमेकांची धार्मीक परंपरा बघितली नाही, तर ते विविधत कशी समजू शकतील. मुलांना शाळेतच सर्व परंपरा समजायला हव्यात, असेही ते म्हणाले.

"कुराणात अल्लाहचा आदेश आहे हिजाब" -असदुद्दीन ओवेसी म्हणाले, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे. अल्लाह आणि कुराणाने हिजाब आणि निकाब आदेश म्हटले आहे. जर एखाद्याला हिजाब परिधान करायचा नसेल तर ती व्यक्ती तसे करू शकते. मात्र, जर कुणाची इच्छा असेल, त्याला परिधान करू द्यायला हवा. मुलींनी हिजाब परिधान करावा, असा आदेश अल्लाहने कुराणात दिला आहे, असेही ओवेसी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIslamइस्लामBJPभाजपा