शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:25 IST

'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत.

हैदराबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीआधी पाटीदार नेता हार्दिक पटेलने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हार्दिक पटेलच्या भूमिकेवर टीका करत मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विट केलं आहे की, 'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत'. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिमांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमसारखी परिस्थिती झाल्याचाही उल्लेख केला.

हार्दिक पटेलची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर असदुद्दीन ओवेसी बोलले की, 'हार्दिक पटेलने सांगितलं की, काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागासलेल्या मुस्लिमांसाठी नाही. याचे अनेक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. पण मुस्लिम राजकीयदृष्या मजबूत नाहीये, आणि दुबळ्या लोकांना शांत बसायला सांगितलं जातं'.

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमचाही उल्लेख केला. स्टॉकहोम सिंड्रोम अशी परिस्थिती असते, जेव्हा अपहरण झालेल्या व्यक्तीला आपल्या अपहरणकर्त्यासंबंधी सहानुभूती वाटू लागते. इथे स्टॉकहोम सिंड्रोम परिस्थिती म्हणजे इतकी वर्ष फसवणूक होऊनही मुस्लिम धर्मनिरपेक्ष पक्षांनाच मतदान करतात असं त्यांना म्हणायचं आहे. 

पाटीदार समाजाला आरक्षण देण्यावरुन काँग्रेसने सादर केलेला फॉर्म्यूला आपल्याला मान्य असल्याचं पाटीदार नेता हार्दिक पटेलने सांगितलं आहे. अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलने पत्रकारांशी संवाद साधला. 'भाजपाने अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असून, आमच्या कार्यकर्त्यांना 50 लाखांचं अमिष दाखवलं. आमच्याविरोधात भाजपाने 200 कोटी खर्च केले',  असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. 'भाजपा गेल्या दोन दशकापासून राज्यात सत्तेत असून, त्यांच्याविरोधात लढाई लढणं गरजेचं आहे', असंही हार्दिक पटेल बोलला आहे. 

हार्दिक पटेलने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन काँग्रेससोबत कोणतीही वाटाघाटी केलेली नाही. पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. पाटीदारांसाठी तिकीट मागितलेलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना 50-50 लाख रुपये देऊन अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे'. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी