शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त, मोदी टी-शर्ट विक्रीत व्यस्त; वाह! क्या चौकीदार है'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:21 IST

'जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अ‍ॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' असा टोला ओवेसी यांनी मोदींना लगावला आहे.

ठळक मुद्देएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अ‍ॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' 'जेट एअरवेज बुडत आहे आणि इकडे चौकीदार एसबीआयचे 1500 कोटी रूपये देत आहे. मेक इन इंडिया’च्या नावाखाली हजारो कारखाने बंद पडले आहेत. तुम्ही या छोट्या उद्योगांना कर्ज देऊ शकत नाही का?'

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अ‍ॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' असा टोला ओवेसी यांनी मोदींना लगावला आहे. तसेच नमो अ‍ॅपवरून टी-शर्टची विक्री होत असल्यामुळे त्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'जेट एअरवेज बुडत आहे आणि इकडे चौकीदार एसबीआयचे 1500 कोटी रूपये देत आहे. मेक इन इंडिया’च्या नावाखाली हजारो कारखाने बंद पडले आहेत. तुम्ही या छोट्या उद्योगांना कर्ज देऊ शकत नाही का?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसींनी पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल मोदींना विचारला होता. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली होती.पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली.

बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

'भारतीय हवाई दलानं बालाकोटवर बॉम्ब टाकले. त्यात 250 दहशतवादी मारले गेले, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीआरपीनं त्या भागात 300 मोबाईल फोन सक्रीय असल्याची माहिती दिली होती. तुम्हाला बालाकोटमध्ये सक्रीय असलेले 300 फोन दिसतात. पण पुलवामात तुमच्या नाकाखालून आणण्यात आलेलं 50 किलो आरडीएक्स दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 

पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवेसी

तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवेसी यांना निझामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, या भाजपाच्या टीकेला अकबरुद्दीन ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजतात का, असा सवाल ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता. आम्ही पंतप्रधानांबद्दल काहीच बोलायचं नाही का? ते स्वत:ला देव समजू लागले आहेत का?, अशा प्रश्नांचा भडिमार ओवेसी यांनी केला होता. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवेसींना निझामासारखं हैदराबाद सोडून पळून जावं लागेल, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. 'आदित्यनाथ यांच्या विधानामागे मोदींची मानसिकता आहे. असे शब्द मोदींच्या मानसिकतेमधूनच येऊ शकतात,' असं म्हणत ओवेसींनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली होती. मोदी स्वत:ला देव समजतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी