शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 15:04 IST

यानंतर आता देशातील सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी यावर तोडगा शोधणे सुरू केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहे. रामललांची प्राणप्रतिष्ठपनाही झाली आहे. मंदिर सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहे. या मंदिराचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल, असे बोलले जात आहे. भाजपही राम मंदिराचा मुद्दा व्यक्ती-व्यक्तीपर्यंत घेऊन जात आहे. महत्वाचे म्हणजे, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत याचा परिणाम होताना दिसत आहे.

विरोधक शोधून काढतायत तोडगा! -यानंतर आता देशातील सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी यावर तोडगा शोधणे सुरू केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांच्यावर देवाला मानत नसल्याचा आरोप केला जातो, असे तामिळनाडू सरकारही आता धर्म आणि इश्वरावर भाष्य करताना दिसत आहे. 

डीएमके पहिल्यांदाच देवाला शरण -तामिळनाडूमध्ये 'मंदिर पॉलिटिक्स' सुरू झाले आहे. महत्वाचे म्हणजे, डीएमके हा नास्तिक विचारधारा असलेला पक्ष मानला जातो. पण, पक्षातील नेत्यांना मंदिर अथवा मशिदीत जाण्यापासून रोखले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांना शरण जाताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डीएमकेची ही खेळी असल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं मंदिरात केली पूजा -यातच दयनिधी स्टॅलिन यांची आई दुर्गा स्टॅलिन यांचा मंदिरातील पूजा करतानाचा फोटो व्हायरल होत आहेत. दुर्गा स्टॅलिन यांनी  राज्यातील मेयिलादुथुरई जिल्ह्यातील थिरुवेंगाडू येथील श्री सुवेधरनायेश्वर स्वामी मंदिरात विधीवत पूजा केली.

मंदिरांमध्ये भक्तांना मोफत ताक मिळणार - लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर डीएमके आपली हिंदू विरोधी छबी सुधारून, हिंदू हितकारक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, मंदिरांमध्ये भक्तांना मोफत ताक वाटप करणे. यासंदर्भात बोलताना राज्याच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभागाचे मंत्री पी. के. शेखर बाबू गुरुवारी सांगितले की, या दिवसांत प्रचंड उन पडते. यामुळे भाविक तहानलेले राहतात. त्यांना मंदिरांमध्ये मोफत ताक दिले जाईल.

मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तहान भागवणे आमचे मुख्य कर्तव्य असून यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव 'नीर मोर' असे आहे. आगामी काळात या योजनेचा संपूर्ण देशभरात विस्तार करण्याचा मानस आहे. एवढेच नाही, तर ही योजना शुक्रवारी राज्यातील 48 मंदिरांमध्ये सुरू केली जाईल, असेही पी. के. शेखर बाबू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरTamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमTempleमंदिर