शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

धक्कादायक! डॉक्टरांनी ऑपरेशन करून मद्यपीच्या पोटातून काढले तब्बल 63 चमचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:05 IST

मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका मद्यपींच्या पोटातून तब्बल 63 चमचे काढण्यात आले. 

मुजफ्फरनगर : आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. अनेक वेळा जेवणामुळे होणाऱ्या छोट्या समस्यांमुळे लोकांना उतरत्या वयात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेवणाची ठरावीक वेळ नसल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. मात्र एका मद्यपीने चक्क चमचांचा आहार घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ऐकून सर्वांनाच धक्का बसत आहे. लक्षणीय बाब म्हणजे डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या पोटातून तब्बल 63 स्टीलचे चमचे काढले आहेत.

दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील आहे, जिथे मसूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपडा गावात राहणाऱ्या विजयसोबत हा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. विजयला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे व्यसन होते, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शामली येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. सुमारे महिनाभर विजय व्यसनमुक्ती केंद्रात थांबला होता. येथेच त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्याला मुजफ्फरनगरच्या भोपा रोडवरील इवान मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 पोटातून काढले 63 चमचे अचानक पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार विजयने डॉक्टरांकडे केली. विजयची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी पोटाचे ऑपरेशन केले, ज्यामध्ये विजयच्या पोटातून तब्बल 63 स्टीलचे चमचे बाहेर आले. पोटातून इतके चमचे बाहेर पडल्यानंतर डॉक्टर आणि कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. इतके चमचे पोटात कसे गेले याचा शोध डॉक्टरांना अद्याप लागलेला नाही. तर विजयला व्यसनमुक्ती केंद्रातच चमचे खाऊ घातले असावेत, असे कुटुंबीयांचे मत आहे. मात्र याबाबत रुग्ण विजयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विजयच्या पोटातून चक्क चमचे बाहेर आल्यामुळे त्याचे कुटुंबीय व्यसनमुक्ती केंद्रावर आरोप करत आहेत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलSocial Viralसोशल व्हायरलalcohol prohibition actदारुबंदी कायदा