शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटात उडाल्या तब्बल ३२ गाड्यांच्या चिंधड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:15 IST

Delhi Blast: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटाचे रहस्य उलगडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्र सरकारच्या तमाम संस्थाचे पथक घटनास्थळाची सखोल पाहणी करीत आहे. यात श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. 

- चंद्रशेखर बर्वे लाल किल्ला (नवी दिल्ली) : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटाचे रहस्य उलगडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्र सरकारच्या तमाम संस्थाचे पथक घटनास्थळाची सखोल पाहणी करीत आहे. यात श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे.

स्फोट एवढा जबरदस्त होता की,  ६०-७० मीटरच्या परिसरात जी वाहने उभी होती त्या सर्वांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. कार, ऑटो रिक्षा, बॅटरी रिक्षा आणि टू व्हीलर अशा एकूण ३२ गाड्यांचे तुकडे तुकडे झाले. गाड्या एकीकडे आणि गाड्यांचे एक्सेल आणि टायर दुसरीकडे असे चित्र घटनास्थळी बघायला मिळाले. काही गाड्या जळून खाक झाल्या. फक्त लोखंडी सांगाडा रस्त्यावर दिसत होता. गाडीच्या काचा आणि सामान तसेच रक्ताचा सडा पडला होता.

हा स्फोट सीएनजीचा होता की बॉम्बचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, हा हल्ला पुलवामा हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सातत्याने मिळत होती. यानंतरही हा स्फोट थांबविण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. 

स्फोट झालेल्या कारचे तीन मालक बदललेनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला, तर वीसहून अधिक जखमी झाले. या स्फोटामुळे परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली. दरम्यान, या स्फोटात वापरलेल्या कारचा मालक मोहम्मद सलमान याला दिल्ली पोलिसांनी हरयाणातील गुरुग्राममधून ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोट झालेली कार ह्युंदाई आय-२० असून त्यात तीन जण प्रवास करत होते. प्राथमिक तपासानुसार, स्फोटानंतर मृत आणि जखमी व्यक्तींच्या शरीरावर शिसे किंवा छर्रे आढळले नाहीत, जे साधारण बॉम्बस्फोटाच्या घटनेत असामान्य मानले जाते. त्यामुळे तपास यंत्रणा या घटनेचे सर्व पैलू तपासत आहे.

स्फोटावेळी गाडीत लोक बसले होतेसलमानने ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर गाडी पुन्हा अंबाला येथे विकण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस आता या दोन्ही व्यवहारांतील व्यक्तींचा शोध घेत आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी गाडीत काही लोक बसलेले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Blast at Red Fort: 32 Vehicles Destroyed, Investigation Underway

Web Summary : A powerful blast near Delhi's Red Fort destroyed 32 vehicles, killing eight and injuring many. Investigators are probing whether it was a bomb or CNG explosion, reminiscent of the Pulwama attack. The car involved had multiple owners; police are investigating all angles.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट