शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:22 IST

महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले.

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभ ही एक ऐतिहासिक घटना ठरली कारण या महाकुंभाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावे नोंदवली. गुरुवारी महाकुंभाचा अनौपचारिक समारोप झाला आणि या काळात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचीटीम संगमच्या काठावर पोहोचली आणि त्यांनी या अनोख्या कामगिरीची घोषणा केली. 

महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या स्नानाने झाला. या विशेष कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. कारण जगभरातील लोकांनी यापूर्वी कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सादर केले आणि या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला. (वृत्तसंस्था)

विक्रम १ : ३६० स्वयंसेवकांची चार ठिकाणी गंगा स्वच्छता

गंगा स्वच्छतेच्या प्रयत्नांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विशेष मोहिमेत ३६० स्वयंसेवकांनी मिळून ४ वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता केली आणि ही मोहीम आता एक नवा विक्रम बनली आहे.

विक्रम २ : १० हजार लोकांनी एकत्रित रंगविली चित्रे

सामूहिक चित्र रंगवण्यात एक नवीन विक्रम करण्यात आला. १०,१०२ लोकांनी एकत्रित चित्रे रंगवली. या पूर्वीचा विक्रम ७,६६० लोकांचा होता. तो महाकुंभमध्ये त्याहूनही मोठ्या प्रमाणात तोडण्यात आला. 

विक्रम ३ : १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढले

महाकुंभमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १९ हजार लोकांनी एकाच वेळी झाडून काढून झाडू अभियान मोहीम पूर्ण केली. यापूर्वी एकाचवेळी १० हजार लोक झाडू अभियानात सहभागी झाले होते.

६६.३०कोटीहून अधिक भाविक आले होते.४,०००हेक्टर क्षेत्रात झाला महाकुंभमेळा.७०,०००हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात होते. ४५दिवसांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० वेळा दौरा केला. १३,०००ट्रेन चालविण्यात येणार होत्या, मात्र  १६ हजारांहून अधिक ट्रेन चालवल्या. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा