शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

५ टक्के GSTचा परिणाम, अमूलचं दही, लस्सी, ताक सारं काही महागलं, आता असे असतील नवे दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:49 IST

Amul Products: जीएसटी परिषदेकडून पाकीटबंद खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आल्यानंतर आजपासून अमूलचं दही, लस्सी, ताक महागलं आहे. तसेच कंपनीने फ्लेवर्ड मिल्क बॉटलच्या दरामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता लवकरच अमूलच्या दुधाच्या पिशवीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई - जीएसटी परिषदेकडून पाकीटबंद खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आल्यानंतर आजपासून अमूलचं दही, लस्सी, ताक महागलं आहे. तसेच कंपनीने फ्लेवर्ड मिल्क बॉटलच्या दरामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता लवकरच अमूलच्या दुधाच्या पिशवीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.  १८ एप्रिलपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यानंतर आजपासून या पदार्थांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खिसा आणखी हलका होणार आहे.

अमूलने मुंबईमध्ये आपल्या २०० ग्रॅम दह्याच्या कपची किंमत आता २१ रुपये केली आहे. तर ४०० ग्रॅम दह्याचा कप आता ४२ रुपयांना मिळेल. पूर्वी या कपची किंमत ही ४० रुपये होती. पाऊचमध्ये मिळणारं ४०० ग्रॅम दहीसुद्धा आता पूर्वीच्या ३० रुपयांऐवजी ३२ रुपयांना मिळणार आहे. तर  एक किलोच्या पॅकेटसाठी आता ६५ रुपयांऐवजी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईमध्ये ताकाच्या ५०० मिलीच्या पिशवीसाठी आता १५ रुपयांऐवजी १६ रुपये मोजावे लागतील. तर १७० मिली लस्सीही आता १ रुपयाने महागली आहे. मात्र २०० ग्रॅम लस्सी पूर्वीच्या किमतीमध्येच मिळेल. अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर आरएस सोढी यांनी सांगितले की, आम्ही छोट्या पाकिटावरील वाढलेल्या किमतीचा भार स्वत: उचलणार आहोत. मात्र काही उत्पादनांवर जीएसटी वाढल्यामुळे भाव वाढवावे लागत आहेत.

दरम्यान, जीएसटी वाढल्यानंतर भाववाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम अमूलने घेतला आहे. आता इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :GSTजीएसटीInflationमहागाई