शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अरविंद केजरीवालांची न्यायालयाकडे विशेष मागणी, ED चा विरोध, न्यायालयात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 12:18 IST

यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या या मागणीला विरोध केला. केजरीवाल यांची कारागृहातूनच सरकार चालविण्याची इच्छा आहे. यामुळे त्यांना कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, असे ईडीने म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार कारागृहात बंद आहे. आता त्यांनी आपल्या वकिलांसोबत भेटीची संख्या वाढवण्यासंदर्भात दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात, कायदेशीर बैठकांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यासंदर्भात आणि आठवड्यातून 2 ऐवजी 5 वेळा भेटण्याची परवानगी देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. यावर शुक्रवारी सुनवणी झाली. 

यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या या मागणीला विरोध केला. केजरीवाल यांची कारागृहातूनच सरकार चालविण्याची इच्छा आहे. यामुळे त्यांना कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही. तसेच, केजरीवाल यांना विशेष अधिकार दिल्यास, त्याचा चुकीचा वापरही होऊ शकतो, ते आपल्या वकिलांच्या माध्यमाने आदेशही जारी करू शकतात, असे ईडीने म्हटले आहे.

ईडीचे वकील जोहेब हुसैन म्हणाले, "केवळ एखाद्या वक्तीने कारागृहातून सरकार चालवण्याचा पर्याय निवडला, म्हणून त्याला आपवाद मानले जाऊ शकत नाही, त्याला विशेषाधिकार दिला जाऊ शकत नाही. कायदेशीर बैठकांचा वापर सल्लामसलतीशिवाय इतर गोष्टींसाठीही केला जाऊ शकतो. तसेच, वकिलांच्या माध्यमाने आदेश काढले जात असल्याची निवेदनेही आहेत. तथापी, पाच कायदेशीर बैठकांची परवानगी देणे कारागृह नियमावलीच्या विरोधात आहे."

केजरीवालांचे वकील काय म्हणाले? -केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील विवेक जैन म्हणाले, आपल्या अशिलाविरुद्ध 35 ते 40 वेगवेगळी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे आठवड्यातून केवळ दोन वेळा अर्ध्या तासाच्या बैठका प्रलंबित प्रकरणांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी पुरेशा नाहीत. याच प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना आपचे खासदार संजय सिंह यांनाही आठवड्यातून तीन वेळा त्यांच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती, असा दावाही जैन यांनी यावेळी केला. याशिवाय, बैठकांच्या गैरवापरासंदर्भात ईडीची शंका चुकीची असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 1 एप्रिल रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय