शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांची ‘देशभक्ती’ : २५ वर्षांच्या विकासाचा पाया असलेला दिल्लीचा अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 05:40 IST

‘आप’ सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष अत्यंत दिमाखात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ मार्चपासून ७५ आठवड्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ‘देशभक्ती’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसह दिल्ली सरकारचे वित्तमंत्री मनीष सिसोदिया यांनी २०२१-२२ चा ६९ हजार कोटी रुपयांचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात दिल्ली १०० टक्के प्रदूषणमुक्त, पुढच्या २५ वर्षांच्या विकासाचा पाया, जगातील सर्वात मोठी मेट्रो, आरोग्य आणि शिक्षण आदी बाबींवी भर देण्यात आला आहे.

हा अर्थसंकल्प सादर करताना सिसोदिया म्हणाले, ‘आप’ सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष अत्यंत दिमाखात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ मार्चपासून ७५ आठवड्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. देशभक्ती अर्थसंकल्पात राज्य सरकार राष्ट्रीय राजधानीत ५०० ठिकाणी राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यासाठी उंच ध्वजस्तंभ उभारणार आहे. त्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील साथीच्या रोगाच्या तडाख्यानंतरही दिल्लीत दरडोई उत्पन्नात १.२ पट वाढ झाली. दिल्ली सरकारचे दरडोई उत्पन्न २०४७ पर्यंत सिंगापूरच्या बरोबरीचे असेल असा आशावाद सिसोदिया यांनी व्यक्त केला. 

महिलांसाठी विशेष मोहल्ला क्लिनिक महिला मोहल्ला क्लिनिक’ सुरू करण्याचा प्रस्ताव असून पहिल्या टप्प्यात १०० महिला मोहल्ला दवाखाने सुरू करणार. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत. दिल्लीतील रहिवाशांना शासकीय रुग्णालयात मोफत कोविड लस देणार. मोफत कोविड लसीकरणासाठी ५० कोटी खर्च करण्यात येईल. 

ई-वाहन खरेदीची टक्केवारी वाढलीनवीन ई-वाहन धोरण सुरू झाल्यापासून ई-वाहन खरेदीची टक्केवारी ०.२ वरून २.२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. राज्यसरकार २५ टक्के ई-वाहन खरेदी करण्याचा संकल्प करीत आहे. दिल्लीत ५०० चार्जिंग स्टेशन वाढवण्यात येणार आहे. प्रत्येक तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन असेल. जेव्हा देश स्वातंत्र्य शतक वर्धापन दिन साजरा करत असेल तेव्हा दिल्ली १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल. दिल्ली सरकारने परिवहन विभागासाठी ९३९४ कोटी तर रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्लीBudgetअर्थसंकल्प