शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: "...पण भारताशी गद्दारी करणार नाही", AAPच्या मंत्र्यावरील कारवाईनंतर केजरीवालांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:56 IST

Arvind Kejriwal: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्याच कॅबिनेट मंत्र्याची हकालपट्टी केली असून, पोलिसांनी मंत्र्याला अटकही केली आहे.

नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant maan) यांनी त्यांच्याच मंत्र्यावर केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भगवंत मान यांच्या या निर्णयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "भगवंत मान यांचा आम्हाला अभिमान आहे. आम आदमी पक्ष आपले मुंडके छाटून घेईल, पण देशाशी गद्दारी कधीच करणार नाही."

'मान यांचा देशाला अभिमान'मीडियाशी संवाद साधताना सीएम केजरीवाल म्हणाले की, "पंजाबमधील या भ्रष्टाचाराची कोणालाही माहिती नव्हती. याची माहिती ना विरोधकांना होती ना मीडियाला. भगवंत मान यांना हवं असतं तर त्यांनी मंत्र्यांकडून स्वत:साठी वाटा मागितला असता. आत्तापर्यंत असे व्हायचे. मान यांना हवं असतं तर ते प्रकरण दाबू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनीच आपल्या मंत्र्यावर कारवाई केली. भगवंत, संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे."

ते पुढे म्हणाले की, ''2015 मध्ये दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाले, तेव्हा मी माझ्या अन्नमंत्र्यांवर अशीच कारवाई केली होती. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आले होते. तेव्हाही कोणालाच माहिती नव्हती, पण मी स्वतः त्यांच्यावर कारवाई केली. आम आदमी पार्टी हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला सोडलं जाणार नाही. आपल्याच लोकांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करत असल्याचे  प्रथमच घडत आहे."

भगवंत मान यांची मंत्र्यांवर कारवाईपंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या विजय सिंगला यांची मंगळवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब सरकारमध्ये आरोग्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे ते मंत्री होते. पंजाब सरकारच्या या कारवाईनंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांच्यावरही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून एसीबीने विजय सिंगला याला अटक केली आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब