शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 19:49 IST

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

BJP On Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आज(दि.15) त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांनी केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार असून, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, केजरीवालांच्या राजीनाम्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा आरोप भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी केला आहे.

भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले, "आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. याचे कारण म्हणजे, त्यांना त्यांच्या आमदारांवर सुनीता केजरीवाल यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास दबाव टाकायचा आहे. लालू-राबरी मॉडेल, सोनिया-मनमोहन मॉडेलप्रमाणे केजरीवालांना संपूर्ण सत्ता हवी, पण जबाबदारी नकोय. माझ्या ट्विट आणि वक्तव्यानंतर आम आदमी पार्टी मागे हटण्याची शक्यता आहे."

"अरविंद केजरीवाल यांनी आपत्तीमध्ये संधी शोधण्यात पीएचडी केली आहे. न्यायालयाने त्यांना अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्त केले नाही, परंतु त्यांना सशर्त जामीन दिला. ते राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत," अशी टीकाही शेहजाद पूनावाला यांनी यावेळी केली. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली. दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या, असेही ते म्हणाले. "आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार? मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की, केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार? मित्रांनो, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत. देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

"जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू राम १४ वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा माता सीतेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील नाव निश्चित होणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील स्वतःची काळजी तेव्हाच घेतील जेव्हा दिल्लीची जनता प्रामाणिक आहे असे म्हणेल. आम्ही दोघे तुमच्यामध्ये येऊ. तुम्ही प्रामाणिक आहात, असे जनतेने सांगितले तर आम्ही या खुर्चीवर बसू. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, जर मी प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मत देऊ नका," असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा