शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देशाला लुटले; CM केजरीवालांनी विधानसभेच ऐकवली गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:11 IST

Arvind Kejriwal in Delhi Assembly: 'अशिक्षित राजाने बनावट पदवी मिळवली, तो स्वतःला एमए पास म्हणू लागला.'

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी एका चौथी पासच्या राजाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, 'राजाने एमएच्या बनावट पदव्या मिळवल्या. आरटीआयद्वारे याबाबत माहिती मागवली असता, त्याने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.' केजरीवाल यांनी या गोष्टीतून पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

पीएम मोदींवर गंभीर टीकाअरविंद केजरीवाल म्हणाले की, 'मी आता एका अशिक्षित राजाची गोष्ट सांगणार आहे. तो राजा चौथी पास होता, पण त्याच्यात खूप अहंकार होता. राजा खूप भ्रष्ट होता. त्याला पैशाची खूप भूक लागली होती. त्या राजाला भाषणे करायची खूप आवड होती. अशिक्षित असल्याने राजाने अनेक फाईल्सवर सह्या केल्या. लोक राजाला कमी शिकलेला म्हणून टोमणे मारायचे, म्हणून त्याने बनावट पदवी मिळवली. तो स्वतःला एमए पास म्हणू लागला.'

'आधी नोटाबंदी, नंतर तीन काळे कायदे केले'अरविंद केजरीवाल यांनी यावेळी नोटाबंदीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एके दिवशी रात्री 8 वाजता राजाने सर्व चलनी नोटा बंद केल्या. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, लोकांचा रोजगार गेला. राजाने आपल्या मूर्खपणामुळे तीन काळे कायदेही आणले. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले.'

'राजाने देशाला प्रचंड लुटले''चौथी पास राजाने आपल्या मित्रासह देशाला प्रचंड लुटले. आपल्या मित्राला सरकारी कंत्राटे मिळवून दिली. राजाने मित्रासोबत देशाची प्रचंड लूट केली. देशातील बँका प्रथम लुटल्या गेल्या. त्याने त्याच्या मित्राला खूप कर्ज मिळवून दिले. राजाने आपल्या मित्राला लाखो कोटींचे कर्ज दिले. दोघांनी मिळून सरकारी मालमत्तेचा ताबा घेतला,' असे केजरीवाल म्हणाले. त्यांच्या या गोष्टीनंतर विधानसभेत एकच हशा पिकला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा