शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:24 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे.

नवी दिल्ली - आज आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पंजाब निवडणुकीसाठी आपने उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. "एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कोणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलात की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर 24 तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

"मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन. सध्या ही फॅशन झाली आहे. सत्याचा मार्ग काट्यांचा असतो. सगळे पक्ष, लोकं आमच्यावर चिखलफेक करत आहेत की तिकिटं विकली. जर कोणी आपवर चुकीचे आरोप केले, तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही. त्याच्यावरही गुन्हे दाखल करू, त्यांनाही तुरुंगात टाकू. जर तुम्ही सिद्ध केलं की तिकिट खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्यांना जेलमध्ये टाकेन. पण इतर कोणी खोटेनाटे आरोप केले, तर त्यांनाही जेलमध्ये टाकेन. त्यांना सोडणार नाही" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली महापालिकांची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत होम क्वारंटाइन असलेल्या 40 हजार कोरोनाबाधितांना योग व प्राणायामाचे मोफत ऑनलाइन वर्ग आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. 

केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला

दिल्लीतील नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लोकांना योग व प्राणायमाचा निश्चितपणे फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राबविला होता. याचा राजकीय फायदा आम आदमी पार्टीला मिळाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या  राजकीय विरोधकांनी केला होता. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारणPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२