शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी खर्च; 'शिशमहाल'वरून राजकारण तापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:32 IST

तत्कालीन नियंत्रक, महालेखापरीक्षक यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष

नवी दिल्ली : केजरीवाल यांच्या शिशमहालवरून सध्या राजकारण तापले आहे. तत्कालीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मु यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष समोर येत आहेत. यात त्यांनी असे म्हटले आहे की, केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

आपने म्हटले आहे की, ही तर भाजपची निवडणुकीपूर्वीची रणनीती आहे. निवासस्थानातील किचनच्या उपकरणांवर ३९ लाख रुपये खर्च करण्यात आले. टीव्ही - २० लाख, जिम उपकरणे १८ लाख, सिल्क कार्पेट १६ लाख, मार्बल स्टोनसाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, अंतिम खर्च ६६ लाखांवर झाला. टाइल्सचे बजेट ५.५ लाख होते. पण ते १४ लाख रुपयांवर पोहोचले. प्रत्यक्ष कामाच्या वेळी बिल्टअप क्षेत्र ३६ टक्क्यांनी वाढले. म्हणजे, १३९७ चौरस मीटरवरून १९०५ चौरस मीटर झाले.

यामुळे वाढला खर्च

वाढीव कामांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ६, फ्लॅग स्टाफ रोड, कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणाचा खर्च वाढला. प्राथमिक अंदाजानुसार, २०२० मध्ये ८.६२ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण केले तेव्हा एकूण खर्च ३३.६६ कोटी रुपये होता. 

कोरोनाकाळात त्यांचे लक्ष शिशमहालवर

  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीतील लोक कोरोनाशी झगडत होते तेव्हा ‘आप-दा लोकांचे’ संपूर्ण लक्ष स्वतःचे शिशमहाल बांधण्यावर होते. 
  • त्यांनी शिशमहालसाठी मोठ्या निधीची तरतूद केली. त्यांना दिल्लीतील लोकांची पर्वा नाही. आज प्रत्येक दिल्लीकर म्हणतोय की, आम्ही ‘आप’ला सहन करणार नाही.
टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक