शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:15 IST

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे.

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. यात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर जनतेला मोफत उपचार, औषधं आणि चाचण्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबत केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी हा फक्त एक काल्पनिक प्रश्न असल्याचं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला ६ महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यात आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मोठ्या घोषणांचा समावेश आहे. केजरीवालांनी केलेल्या घोषणांमुळे आता पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार आहे. पंजाब काँग्रेसला तोडीस तोड आव्हान देण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे. 

केजरीवालींनी दिलेली ६ महत्त्वाची आश्वासनं...- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीवर मोफत व उत्तम उपचार- संपूर्ण उपचार, चाचण्या, औषधं मोफत देणार. शस्त्रक्रियेचा २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला हेल्थकार्ड दिलं जाणार. यात एमआरआय, एक्स-रे इत्याही अहवाल सादर केले जातील. - पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर 'पिंड क्लिनिक' उभारले जाणार. याची एकूण संख्या १६ हजारांच्या आसपास असेल.- पंजाबमधील सर्व शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक आणि स्वच्छ करणार. मोठ्या प्रमाणात नवी रुग्णालयं सुरू केली जाणार- पंजाबमध्ये रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार

पंजाबमध्ये सरकारचा तमाशा- केजरीवाल"पाच वर्षांपूर्वी जेव्हा पंजाबमधील जनतेनं मोठ्या विश्वासानं काँग्रेसच्या हातात इथली सत्ता दिली होती. पण आज काँग्रेस काहीच काम करताना दिसत नाही. यांनी फक्त तमाशा सुरू केला आहे आणि खुर्चीसाठी घाणरडं राजकारण खेळलं जात आहे. त्यांच्यातील प्रत्येक नेत्याला आज मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालीय", असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjabपंजाब