शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CM अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 18:17 IST

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.

Arvind Kejriwal News: दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात कैद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सीबीआयशी संबंधित प्रकरणात केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी मंगळवारी(दि.20) केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ केली. 

सीएम अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी केजरीवालांच्या कोठडीत वाढ केली. दरम्यान, सीबीआयने केजरीवालांविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावर येत्या 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार ईडी प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता, परंतु सीबीआयने अटक केल्यामुळे त्यांची सुटका होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, अटकेविरोधातील याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला नोटीस दिली. सुप्रीम कोर्टात सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 23 ऑगस्टला होणार आहे.

याचिका दिल्ली उच्च न्यायालयात फेटाळण्यात आलीदुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी सीएम केजरीवाल यांची याचिका 5 ऑगस्ट रोजी फेटाळली होती. उच्च न्यायालयानेही अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणत्याही योग्य कारणाशिवाय अटक झाली, असे म्हणता येणार नाही. जामीन अर्जाचा प्रश्न आहे, तुम्ही यासाठी ट्रायल कोर्टात जाण्यास मोकळे आहात. विशेष म्हणजे, याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग