शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'शूर व्यक्ती', अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची रुग्णालयात घेतली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 16:26 IST

मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर दोन्ही नेत्यांची रुग्णालयात ही पहिलीच भेट होती.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एलएनजेपी रुग्णालयात दाखल माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची भेट घेतली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर दोन्ही नेत्यांची रुग्णालयात ही पहिलीच भेट होती. यावेळी आपल्या पक्षाच्या नेत्याला भेटून आनंद झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची गळाभेट घेतली. तसेच, त्यांनी ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर करत सत्येंद्र जैन यांचा हिरो आणि शूर व्यक्ती असा उल्लेख केला आहे.

दिल्ली सरकारमधील माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये चक्कर आल्याने ते खाली कोसळले होते. या घटनेनंतर उपचारासाठी त्यांनी आधी डीडीयू रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले.

सत्येंद्र जैन यांना 30 मे 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. प्रकृतीच्या समस्येचे कारण देत त्यांनी अनेकवेळा जामीन मागितला होता. गुरुवारी तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 42 दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.

सत्येंद्र जैन यांची भेट घेण्यापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी मिळताच अरविंद केजरीवाल यांनी  यांनी ट्विट केले होते की, "जी व्यक्ती जनतेला चांगले उपचार आणि आरोग्य  देण्यासाठी रात्रंदिवस झटत होती, त्या चांगल्या व्यक्तीला एक हुकूमशहा मारायला झुकला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार आहे - प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त 'मी' मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. पण देव सर्व पाहत आहे, तो न्याय देईल. सत्येंद्र जैन लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली