शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

'अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाचे सूत्रधार, AAP नेत्यांनी पुरावे दिले', CBI चा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:42 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

Delhi Excise Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्ली मद्य घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सोमवारी (29 जुलै) केजरीवाल या घोटाळ्याचे खरे मास्टरमाइंड असल्याचा दावा केला आहे. सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील डीपी सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, एजन्सीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ठोस पुरावे सापडल्यानंतरच त्यांना अटक केली.

दिल्ली उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी सीबीआयच्या वकिलाने हा दावा केला आहे. त्यामुळे न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे.

सीबीआयच्या वकिलाने कोर्टात काय दावा केला?डीपी सिंह म्हणाले की, केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आप कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांमुळे तपास यंत्रणेला पुरावे मिळाले. आप प्रमुखांना अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नाही. अरविंद केजरीवाल यांचा या घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सीबीआयकडे आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही मुख्यमंत्री प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, असेही सीबीआयच्या वकिलांनी म्हटले.

केजरीवालांचे वकील काय म्हणाले?दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना अटक केल्यापासून एजन्सीने पोलिस कोठडीत असताना त्यांची चौकशी केली नाही. एजन्सीकडे केजरीवाल यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे नाहीत आणि घरातून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. उत्पादन शुल्क धोरण तयार करणारे किंवा अंमलबजावणी करणारे केजरीवाल एकमेव व्यक्ती नव्हते, परंतु हा एक संस्थात्मक निर्णय होता, ज्यात एलजी आणि नऊ मंत्रालयांसह किमान 50 नोकरशहांचा समावेश होता. सीबीआयने नायब राज्यपालांनाही आरोपी बनवावे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआप