शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

Arvind Kejriwal Trolled: 'माझी मागणी १३० कोटी भारतीयांची भावना'; केजरीवालांचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:42 IST

पत्रावरून नेटकऱ्यांनी केजरीवालांचीच घेतली फिरकी

Arvind Kejriwal Trolled: देशात सध्या चलनी नोटांवरील फोटोंचा मुद्दा गाजताना दिसतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीगणेशाचे फोटोही (Laxmi Ganesh photos on Indian currency notes) असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Narendra Modi) लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात केजरीवाल यांनी लिहिले आहे की, देशातील १३० कोटी लोकांना भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणेश आणि लक्ष्मीचे चित्र हवे आहे. हे पत्र (letter) अरविंद केजरीवाल यांनीही शुक्रवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. माझी मागणी म्हणजे देशातील १३० कोटी लोकांच्या भावना आहेत असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यावरून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

अरविंद केजरीवाल यांचे हे पत्र मीडिया आणि सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागले. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मी दिवाळीला पूजा करत असताना नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा, असे माझ्या मनात आले होते. ही १३० कोटी जनतेचीच भावना आहे. यावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

काही लोकांनी लिहिले आहे की- केजरीवाल त्यांची मन की बात १३० कोटी भारतीयांची इच्छा म्हणून सांगत सुटले आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी अरविंद केजरीवाल यांना १३० कोटी लोकांना नोटांवर लक्ष्मी गणेशाचा फोटो कुठे हवा आहे, हे दाखवण्याचे आव्हान केले. @AnilKum32178832 यांनी लिहिले- तुम्ही १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधी कसे झालात? फक्त दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि त्या राज्यात लोकांनी फक्त ५०% लोकांनी मतदान केले आहे, त्यामुळे एकूण ४ ते ५ कोटी लोकांचे प्रतिनिधित्व तुम्ही करू शकता. मग निवडणूक जाहीरनाम्यात गणेशजींचा फोटो लक्ष्मी छापणार असे लिहिले होते का? इतकं फेकणं (खोटं बोलणं) ठीक नाही!!

धर्माच्या नावावर राजकारण करण्यात आम आदमी पक्ष भाजपसारखाच आहे, असे काहींनी लिहिले. @gyanveerBns नावाच्या युजरने लिहिले की, गुजरात निवडणुकीपर्यंत केजरीवाल कट्टर हिंदूच राहतील. @Ramraajya नावाच्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल यांनी आता सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी आणि नथुराम गोडसे यांना राष्ट्रपिता बनवण्याची मागणी करावी, असेही लिहिले. @Real_Sbshukla यांनी दिवाळीनिमित्त वृत्तपत्रांमध्ये दिल्ली सरकारच्या जाहिरातीचा फोटो शेअर करत लिहिले की, स्वतःच्या दिवाळीच्या जाहिरातीत लक्ष्मी गणेशाची आठवण का येत नाही. इतर युजर्सनीही या जाहिरातीचा फोटो शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीTrollट्रोल