शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची ‘वॉशिंग मशिन’ चौकात तोडणार; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल, मतदारांना १० गॅरंटीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:12 IST

देशात ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘वॉशिंग मशिन’ चौकात उभी करुन तोडू, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीतील दहा गॅरंटींची घोषणा केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात ‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘वॉशिंग मशिन’ चौकात उभी करुन तोडू, अशा शब्दात भाजपवर हल्ला चढवून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चालू लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या दहा गॅरंटींची घोषणा केली. 

प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवणारा आणि भ्रष्टांना संरक्षण देणारा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा स्त्रोत भाजपची वॉशिंग मशिन आहे, अशी टीका करीत त्यांनी रविवारी दहा गॅरंटींची घोषणा केली. 

शेतकरी, बेरोजगार, जवानांसाठी नेमके काय करणार?

- देशात चोवीस तास वीजपुरवठा आणि देशातील सर्व गरीबांना मोफत वीज - देशातील १८ कोटी मुलांना उत्तम, दर्जेदार, मोफत शिक्षण- देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य विम्याशिवाय मोफत उपचार- लष्करभरतीसाठी सुरु केलेली अग्नीवीर योजना बंद करुन जवानांची भरती कायमीस्वरुपी करणार. - देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक तितका निधी खर्च करणार- स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला पूर्ण भाव मिळवून देणार - सत्तेत आल्यास सर्वांगीण विकासासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार  - भाजपच्या भ्रष्टाचाराची वॉशिंग मशिन चौकात उभी करुन तोडणार - दरवर्षी देशातील दोन कोटी युवकांना रोजगाराचे साधन मिळवून देणार- चीनला मागे टाकण्यासाठी व्यापार आणि उद्योगाला पूर्ण प्रोत्साहन 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४