शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:58 IST

केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.

मद्य घोटाळाप्रकरणी कारागृहातून पॅरोलवर बाहर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी, भारताची तुलना थेट रशियासोबत केली आहे. देशातील परिस्थिती अशी कधीच नव्हती. केंद्र सरकार विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे सचिव बिभव कुमार यांच्यावरच मारहाणीचा आरोप केला आहे.

पंजाबमध्ये प्रचारादरम्यान केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख करत, ते त्यांच्या विरोधकांना मारून टाकतात, असे म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले, 'जसे रशियात होते, एक तर पुतिन सर्व विरोधकांना कारागृहात टाकतात, अथवा त्यांना मरून टाकतात आणि निवडणुक घेतात आणि 87 टक्के मते मिळवतात. जर कुठला विरोधी पक्षच नसेल, तर केवळ तुम्हीच असाल, ज्यला, मतदान होईल'. यावेळी केजरीवाल यांनी सरकारवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डीएमकेला त्रास दिल्याचाही आरोप केला आहे. 

मालीवाल प्रकरण -दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष मालीवाल यांनी कुमार याच्यावर थापड आणि बुक्का मारल्याचा आरोप केला आहे. मालीवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या निवासस्थानीच मारहण झाल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे, घटना घडली तेव्हा केजरीवाल घरातच होते, असा दावाही करण्यात आला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालrussiaरशियाGovernmentसरकारjailतुरुंग