शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 20:00 IST

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणासंदर्भातील कथित घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे.

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आता सीबीआयने एन्ट्री घेतली असून, या सपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी याच शासकीय बंगल्याच्या नूतनीकरण प्रकरणी कॅगच्या विशेष ऑडिटला मान्यता देण्यात आली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरण प्रकरणातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याआधारे गृह मंत्रालयाने सीबीआय तपासाला परवानगी दिली. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केलेल्या तपासानंतर समोर आलेल्या कथित अनियमिततेची आता सीबीआय चौकशी करणार आहे. या प्रकरणी सीबीआय तपासाच्या आदेशानंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. 

आम आदमी पक्ष संपवण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली

आम आदमी पक्ष संपवण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद लावल्याची टीका करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, संपूर्ण देशात फक्त आम आदमी पक्ष असा आहे, जो शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करून मते मागत आहे. गरिबांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात असे भाजपला वाटत नाही. भाजपच्या धर्म आणि जातीच्या राजकारणाचा पराभव होईल. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्यात आले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यासाठी सर्व तपास यंत्रणांना कामाला लावण्यात आले आहे. पण दिल्लीतील दोन कोटी जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत, असा विश्वास आम आदमी पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

दरम्यान, आत्तापर्यंत अरविंद केजरीवाल यांच्यावर ५० हून अधिक खटले दाखल केले आहेत आणि तपास केला आहे. त्यापैकी एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही. यातूनही काही निष्पन्न होणार नाही. भाजपने कितीही तपास वा चौकशी केली तरी अरविंद केजरीवाल सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहतील. अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली आहे की, आपण भारताला जगातील नंबर वन देश बनवू. यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे, असे आम आदमी पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे. 

नेमके प्रकरण काय?

अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे आणि असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत. १ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आले आहेत, तर ४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आले आहे. घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती. यामध्ये लायटिंग काम आणि स्वयंचलित फायर अलार्म सिस्टमसह आरसीसी-फ्रेम केलेल्या संरचनेवरच्या कामाचा समावेश होता. दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये मॉड्यूलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री इत्यादी बनवण्यासाठी देण्यात आली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCBIगुन्हा अन्वेषण विभागCBIसीबीआयCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण