शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार?,'शीशमहाल'ची सखोल चौकशी होणार, सीव्हीसीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:02 IST

केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना 'शीशमहाल' म्हणून उल्लेख होत असलेला बंगला त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान होते. या बंगल्यावरून आता नवा वाद उफाळून आला आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीव्हीसीच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून आठ एकरमध्ये ४०,००० चौरस यार्ड जमिनीवर बंगला बांधला. आता सीपीडब्ल्यूडी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अद्याप अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, गेल्या वर्षीच भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी सीव्हीसीला पत्र लिहून या बंगल्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. बंगल्याच्या नूतनीकरण आणि बांधकामात सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले होते. तसेच, भाजपने निवडणूक काळात बंगल्याची पुनर्बांधणी करताना अरविंद केजरीवाल यांनी आसपासच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोपही केला होता. तसेच,  अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर हा बंगला रिकामी केला. त्यानंतर PWD ने बंगल्याच्या सामानांची यादी प्रसिद्ध केली. ती यादी माध्यमांसह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली