शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रामलीला मैदानाचे नाही, मोदींचे नाव बदला - अरविंद केजरीवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:25 IST

रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदला, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, रामलीला मैदानाचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयींचे नाव ठेवल्याने मते मिळणार नाहीत. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव बदलले पाहिजे. त्यामुळे त्यांना काही मते मिळतील. कारण, त्यांना आपल्या नावावर तर मते मिळत नाही आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात काही नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर येत्या 30 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानाचे नाव बदलण्यासाठी सुरुवातीला प्रस्ताव संबंधित महानगरपालिकेच्या नेमिंग कमेटीकडे जाईल. या नेमिंग कमेटीमध्ये महापौर आणि विरोधी नेत्यासह सहा सदस्य यावर चर्चा करतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त प्रस्ताव दाखल करणा-यांना सदस्यांना कारण विचारतील. त्यानंतर आयुक्तांच्या अहवालानंतर नेमिंग कमिटी नाव बदलण्याचा निर्णय घेतील.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल