शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:48 IST

मनीष सिसोदीया यांच्या बंगल्यात दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी राहणार आहेत.

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपला सरकारी बंगला सोडला आहे. आता सिसोदिया आपल्या कुटुंबासह आपचे खासदार हरभजन सिंग यांच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत. सिसोदिया यांचा AB-17 बंगला दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या आपला सरकारी बंगला सोडणार आहेत.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचे आरोप लागल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्याकडे असलेली शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे देण्यात आली. तर, याच घोटाळ्याचे आरोग लागल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीदेखील काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे त्यांनाही आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागत आहे. 

अरविंद केजरीवाल कुठे राहणार?अरविंद केजरीवाल उद्या (4 ऑक्टोबर) आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर केजरीवाल आणि त्यांचे कुटुंब 5, फिरोजशाह रोड येथे 'आप'चे खासदार अशोक मित्तल यांच्या बंगल्यावर राहणार आहेत. केजरीवालांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांनी सरकारी बंगला सोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, उद्या ते बंगला रिकामा करतील. 

केजरीवाल मित्तल यांच्या घरी किती दिवस राहणार?दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'सुरुवातीला केजरीवालांनी आपल्या मतदारसंघात राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर त्यांनी तो निर्णय बदलून मित्तल यांच्या बंगल्याच राहण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत नाहीत, तोपर्यंत ते याच पत्त्यावर राहणार आहेत.

आमदारांना सरकारी घरे मिळत नाहीतमनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री राहिले नाहीत. ते आता फक्त दिल्लीचे आमदार आहेत. दिल्लीत आमदारांना सरकारी घरे मिळत नाहीत. त्यामुळे दोन्ही आमदारांचा मुक्काम आपच्या खासदारांच्या निवासस्थानी असणार आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपdelhiदिल्ली