शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल घाबरट, सिद्धूंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 17:13 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे.

चंदिगड - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे. तर काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनीही माफीनाम्यावरून केजरीवाल यांना टोला लगावला आहे. मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल हे घाबरट असल्याचा टोला केजरीवाल यांनी लागावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र त्या केरजीवाल यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या मजिठिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अखेर केजरीवाल यांनी  मजिठिया यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केजरीवालांवर खोचक शब्दात टीका केली आहे. "मजिठियांची माफी मागून केजरीवाल यांनी घाबरटपणा दाखवला आहे. ही पंजाबमधील जनतेची फसवणूक आहे. केजरीवाल यांनी असे करून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची हत्या केली आहे. आता ते पंजाबमध्ये कोणत्या तोंडाने अमली पदार्थांविरोधात बोलणार आहेत," असा सवाल सिद्धू यांनी केला आहे. 

दरम्यान अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर आपचे पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी आम आदमी पक्षाच्य़ा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र ड्रग्ज माफिया आणि पंजाबातील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मी पंजाबच्या 'आम आदमी'बरोबर कायम असेन असं ट्वीट मान यांनी केलं आहे. त्याबरोबरच आपचे पंजाबातील दुसरे नेते सुखपाल सिंग खैरा यांनीही केजरीवाल यांच्या माफीनाफ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब सरकारने मजिठिया यांच्याविरोधात सबळ पुरावे दाखल करुनही अरविंद केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितल्यामुळे पंजाबात आम्ही सगळे (आम आदमी पभाचे नेते, कार्यकर्ते) नाराज झालो आहोत असे खैरा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjabपंजाब