शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्या मद्य घोटाळ्याचे अरविंद केजरीवालांवर आरोप, त्याच्या विक्रीतून दिल्ली सरकारला बंपर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 20:46 IST

Arvind Kejriwal : ज्या मद्य घोटाळ्यावरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्याच्या माध्यमातूनच दिल्ली सरकार मालामाल होत असल्याची माहिती समोर येत आहे.

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आपच्या काही नेत्यांकडून केजरीवाल यांना ईडी अटक करेल, असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात याआधी ईडीने मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. मात्र ज्या मद्य घोटाळ्यावरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्याच्या माध्यमातूनच दिल्ली सरकार मालामाल होत असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये मद्याची अधिक दुकाने असल्याने आणि वेगवेगळ्या ब्रँड्सची उपलब्धता असल्याने मद्याच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. दिल्ली सरकारच्या एक्साइज डिपार्टमेंटच्या महसुलामध्ये मागच्या आर्थिक वर्षामध्ये याच काळात गोळा झालेल्या महसुलापेक्षा ९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.  एक्साईज डिपार्टमेंटने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विविध मद्याची दुकानं आणि हॉटेल व रेस्टॉरंटच्या माध्यमातून झालेल्या मद्याच्या विक्रीमधून एक्साइज ड्युटी आणि व्हॅल्यू अॅडेड टॅक्सच्या माध्यमातून १८८९.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात काळात या तिमाहीमध्ये मद्य विक्रीवरील एक्साइज ड्युटीमधून १७२५.६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एवढंच नाही तर नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील मद्य दुकानांवरून वेगवेगळ्या ब्रँडच्या ४८ कोटी रुपये किमतीच्या २४ लाख बाटल्यांची विक्री झाली. मद्याच्या बाटल्यांवरील एक्साइज ड्युटी आणि व्हॅल्यू अॅडेट टॅक्समधून होणारी कमाई हे दिल्ली सरकारच्या महसुलाचे माध्यम आहे. एक्साइज फीच्या माध्यमातून २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींमध्ये दिल्ली सरकारने एकूण ५ हजार ४५३.६ कोटी रुपये गोळा केले आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली