शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांतील सरकारं पाडण्यासाठी मोदी सरकारच्या रथाला तीन घोडे; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:59 IST

"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे."

केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) या विधेयकाला रस्त्यापासून संसदेपर्यंत कडाडून विरोध केला. मात्र संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही, त्यासंदर्भात गदारोळ सुरूच आहे. आता दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात आप प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे. या रथाला ED, CBI आणि कॅश, हे तीन घोडे आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, या रथाच्या बळावर भाजपने 9 राज्यांतील सरकारे पाडली आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनाही 25-25 कोटींचे आमिष दाखवण्यात आले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले. हे लोकही भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही जामीन मिळेल. त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, जेव्हा दिल्लीत भाजपचा रथ येऊन थांबला, तेव्हा हे विधेयक आणले गेले. एवढेच नाही, तर मोदी दिल्लीतील लोकांचा तिरस्कार करतात, असेही केजरीवाल म्हणाले.

'पूर्ण राज्याचा दर्जा' या मुद्द्यावर लढवली जाणार पुढची निवडणूक -अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक 'पूर्ण राज्याचा दर्जा' मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढली जाईल. केंद्र आणि नायब राज्यपालांवर निशाणा साधताना ते म्हणाले, जर आपल्याला (केंद्राला) वाटत असेल की, आपण नायब राज्यपालांच्या माध्यमाने देश चालवू, तर देशातील 140 कोटी जनता हे मॉडेल चालू देणार नाही. याचवेळी, आगामी लोकसभा निवडणूकही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर लढवली जाईल. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व सातही जागांवर पराभूत होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा