नवी दिल्ली : श्वसनाच्या त्रासामुळे शुक्रवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलेले माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शनिवारी सकाळी एम्समध्ये जाऊ नअरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.तेथील डॉक्टरांनी उपराष्ट्रपतींना सांगितले की, जेटली यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि ते औषधोपचारांना योग्य प्रतिसादही देत आहेत. त्यांचा रक्तपुरवठा व्यवस्थित असून, हृदयही नीट कार्य करीत आहे. वेंकय्या नायडू यांनी तिथे अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, उपराष्ट्रपतींनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:20 IST