नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात भारताने उशिराने पाऊल ठेवल्याची चर्चा होत असली, तरी ही उशिरा एन्ट्री भारतासाठी सर्वात मोठे वरदान ठरणार आहे. संसदेत गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याचे अत्यंत सकारात्मक विश्लेषण करण्यात आले आहे.
पाश्चिमात्य देशांनी एआयसाठी वापरलेले प्रचंड ऊर्जा खाणारे आणि आर्थिकदृष्ट्या जोखमीचे मार्ग टाळून, भारत आता स्वतःचा ‘कमी संसाधन आणि अधिक समावेशक’ असा मार्ग निवडू शकतो, असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
नेमका फायदा काय? ज्या देशांनी एआय क्षेत्रात सर्वात आधी सुरुवात केली, त्यांनी नियमन नसताना आणि स्वस्त भांडवलाच्या काळात अफाट गुंतवणूक केली. आता ते देश अशा चक्रव्यूहात अडकले आहेत, जिथून मागे फिरणे कठीण आहे. भारताला मात्र या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली आहे.
पर्यावरणाचे रक्षण: सुरुवातीच्या देशांचे मॉडेल्स प्रचंड वीज वापरतात. भारत ऊर्जा कार्यक्षम मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करू शकतो.आर्थिक सुरक्षा: स्पष्ट नफा नसतानाही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या जोखमीपासून भारत वाचू शकतो.नियमन आधी, वापर नंतर : प्रगत देशांमध्ये तंत्रज्ञान आल्यावर नियम बनले, मात्र भारत नियमन, डेटा सुरक्षा आणि वापर एकाच वेळी विकसित करणार आहे.
Web Summary : India's late entry into AI is a boon, says economic survey. It allows learning from the West's costly mistakes, focusing on resource-efficient, inclusive development, energy-efficient models, and simultaneous regulation, data security, and usage. This avoids risky, unprofitable investments.
Web Summary : आर्थिक सर्वेक्षण के अनुसार, एआई में भारत की देरी से एंट्री एक वरदान है। यह पश्चिम की महंगी गलतियों से सीखने, संसाधन-कुशल, समावेशी विकास, ऊर्जा-कुशल मॉडल और एक साथ विनियमन, डेटा सुरक्षा और उपयोग पर ध्यान केंद्रित करने की अनुमति देता है। इससे जोखिम भरे, अलाभकारी निवेशों से बचा जा सकता है।