शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसांना फटका; ॲमेझॉनमध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:29 IST

ॲमेझॉनमध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) अनेक क्षेत्रात लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचे समोर आहे. ॲमेझॉनने ‘ॲलेक्सा व्हॉइस असिस्टंट युनिट’मध्ये कर्मचारी कपात करून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे अधिक लक्ष देणार आहे. ॲलेक्सा आणि फायर टीव्हीचे उपाध्यक्ष डॅनियल रॉश म्हणाले की, स्रोतांत वृद्धी करून एआयवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये ॲमेझॉनने ॲलेक्सामधील एआय यंत्रणा अद्ययावत केली होती.

सूत्रांनी सांगितले की, ॲमेझॉनमधील नव्या कर्मचारी कपातीचा फटका भारत व कॅनडासह अनेक देशांतील कर्मचाऱ्यांना बसेल. ॲमेझॉनमध्ये होत असलेली ही काही पहिलीच कर्मचारी कपात नाही. याआधी कंपनीने अनेकवेळा कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यंदा आतापर्यंत २७ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने घरी बसवले आहे. 

ॲमेझॉन ॲलेक्सा हे एक व्हॉइस असिस्टंट युनिट आहे. टायमर सेट करणे, सर्च करणे, संगीत प्ले करणे तसेच होम ऑटोमेशनसाठी ॲलेक्साचा उपयोग होतो. ॲमेझॉनला अनेक कंपन्यांकडून आव्हान मिळत  असल्याने येत्या काळात एआयवरील पकड मजबूत राहावी, यासाठी कंपनीने धोरणात बदल केला आहे.

१८० जणांना काढलेॲमेझॉनने अलीकडेच आपल्या गेम डिव्हिजनमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कर्मचारी कपात करताना १८० जणांना काढले आहे. कंपनीच्या गेम डिव्हिजनमध्ये व्यवसायात अडचणी होत्या. त्यामुळे कर्मचारी कपात करण्यात आली. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सjobनोकरीamazonअ‍ॅमेझॉन