शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:27 IST

३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रदेश भारतीय संघराज्याशी योग्य पद्धतीने जोडला गेला आहे. ३७० कलमाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.

नवी दिल्ली : ३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रदेश भारतीय संघराज्याशी योग्य पद्धतीने जोडला गेला आहे. ३७० कलमाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असे केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामन, न्या. एस. के. कौल, न्या. भूषण गवई, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी सुरू आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या आहेत.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम संसदेने ५ आॅगस्ट रोजी रद्दबातल केले. यासंदर्भात अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, या कलमामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले सार्वभौमत्व हे तात्पुरते होते. ते कलमच रद्दबातल झाल्यामुळे जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थाने व पूर्णपणे भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले आहे.असे अन्य राज्यांबाबतही करतीलएका याचिकादारातर्फे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी न्यायालयाला सांगितले की, जम्मू-काश्मीरला राज्याचा असलेला दर्जा काढून तो केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. काश्मीरबाबत घेतला तसा निर्णय केंद्र सरकार अन्य कोणत्याही राज्यासंदर्भात घेऊ शकते हा त्यातील एक धोका आहे. सरकारने काश्मीरमध्ये जाणूनबुजून राष्ट्रपती राजवट लादली.आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी धवन यांनी जम्मू-काश्मीरच्या नकाशाकडे न्यायाधीशांचे लक्ष वेधले. त्यांच्या या कृतीला जम्मू-काश्मीरच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विरोध केला. तेव्हा राजीव धवन म्हणाले की, जर अटर्नी जनरल आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंची उदाहरणे देऊ शकतात, तर मी जम्मू-काश्मीरचा नकाशा न्यायमूर्तींना दाखविल्यास त्यात काहीही वावगे नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार