शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 09:17 IST

दोन महिन्यांपासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प

श्रीनगर: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली. याचा परिणाम राज्यातील संपर्क व्यवस्थेवर झाला आहे. काश्मीरमध्ये कित्येक वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे. काश्मीरमधील आयटी कंपन्या धोक्यात आल्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रंगरेट भागात काश्मीरमधलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर पार्क आहे. यातील अनेक आयटी कंपन्या सध्या धोक्यात आहेत. इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीत भागीदार असलेल्या शौकत अहमद यांनी त्यांची व्यथा मांडली. सहा वर्षांपूर्वी अहमद यांनी सुरू केलेल्या कंपनीत सध्या ३० पेक्षा अधिक तरुण काम करतात. त्यांच्या कंपनीकडे देश, परदेशातील अनेक प्रकल्प आहेत. मात्र गेले दोन महिने इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीला प्रचंड नुकसान सोसावं लागलं आहे. आमचं संपूर्ण काम इंटरनेट चालतं. मात्र इंटरनेट सुविधाच नसल्यानं आमच्या ग्राहकांशी संपर्क साधताना अतिशय अडचणी येत असल्याचं शौकत यांनी सांगितलं. इंटरनेटच नसल्यानं आम्ही काम थांबवलं आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्हाला कंपनी बंद करावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शाहिद नासीर नावाच्या उद्योजकानंदेखील कंपनी संकटात सापडल्याचं सांगितलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भविष्यासाठी चांगला असल्याचं सरकार सांगतं. मात्र आमच्या वर्तमानाचं काय, असा सवाल नासीर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370