शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:12 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब यांसह आणखी काही राज्यांत पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्यात आपल्याला पराभव पत्करावा लागेल, या भीतीपोटीच केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.ते म्हणाले की, शेतकरी हे या देशाचे अन्नदाता आहेत. त्यांनी अन्यायाविरोधात जो लढा दिला, त्याच्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. सत्याग्रहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा विजय मिळविला आहे. अन्यायाविरुद्ध मिळविलेल्या या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी राहुल गांधी यांनी जय जवान, जय किसान ही घोषणाही उद्धृत केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी कायम पाठिंबा दिला होता.

काय होते तीन कृषी कायदे?

१ पहिला कृषी कायदा हा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक २०२० होता. यामुळे शेतकरी त्याला हव्या त्या ठिकाणी त्याचे पीक विकू शकत होता. त्याला विनाअडथळा दुसऱ्या राज्यांतही पीक विकता व विकत घेता येत होते. कृषी उत्पादनांचा हा व्यापार राज्य सरकारांनी लावलेल्या मंडी करातून मुक्त केला गेला होता.२ दुसरा कृषी कायदा हा शेतकरी किमत हमी आणि कृषी सेवा अधिनियम २०२० होता. त्यानुसार शेतकऱ्यांना करारावर शेती करणे आणि आपल्या पिकाचे विपणन करण्याची अनुमती देणारा होता. ३ तिसरा कायदा हा आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम होता.  असाधारण स्थिती वगळता व्यापारासाठी खाद्यान्न, दाळ, खाद्य तेल आणि कांद्यासारख्या वस्तुंवरील साठा मर्यादा काढून टाकली गेली.

अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रियाn    संसदेच्या सभागृहामध्ये नवा कायदा करताना व तो कायदा रद्द करतानाची प्रक्रिया सारखीच असते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतरच तो निर्णय अमलात येईल. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. ते २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.n    सातव्या, आठव्या, नवव्या लोकसभेचे सेक्रेटरी जनरल सुभाष कश्यप यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात येईल. जशी अन्य विधेयकांवर होते तशीच याविधेयकावरही लोकसभेत चर्चा होईल. त्यानंतर सभागृहात मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया पार पडेल. अशीच प्रक्रिया राज्यसभेतही पार पडेल. त्यानंतरच तीन कृषी कायदे रद्द झाल्याचा निर्णय लागू होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी