मिकींविरुद्ध कॅसिनो धमकी प्रकरणीही अटक वॉरंट
By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे कॅसिनोतील धमकी प्रकरणात पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शबनम शेख यांनी पाशेको यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
मिकींविरुद्ध कॅसिनो धमकी प्रकरणीही अटक वॉरंट
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे कॅसिनोतील धमकी प्रकरणात पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शबनम शेख यांनी पाशेको यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.माजोर्डा येथील कॅसिनोतील धमकीप्रकरणी पाशेको व त्यांचे मित्र मॅथ्यू दिनिज यांच्यावर सध्या येथील प्रथमवर्ग न्यायालयात खटला चालू आहे. २९ मे २00९ रोजी हे प्रकरण घडले होते. न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून सूट द्यावी, असा अर्ज मिकी पाशेको यांच्यातर्फे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बुधवारी सादर केला असता, तो नामंजूर करण्यात आला होता. पाशेको यांच्या वतीने त्यांचे वकील श्रीकांत नाईक यांनी वरील अर्ज न्यायालयात सादर केला होता. माजोर्डा हॉटेलचे जनरल मॅनेजर गेराल्ड फर्नांडिस यांनी या प्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोन्ही संशयितांविरुद्ध भादंसंच्या ३५२, ३४१, ५0६ कलमांखाली गुन्हा नोंद केला होता.पाशेको हे नाटेकर मारहाणप्रकरणी सवार्ेच्च न्यायालयाने कायम केलेल्या सहा महिन्यांच्या शिक्षेविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी दिल्लीत असल्याने त्यांना माजोर्डा कॅसिनोप्रकरणी न्यायालयात सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी अनुमती द्यावी, असा अर्ज पाशेको यांचे वकील नाईक यांनी न्यायालयात केला होता. या अर्जाला जोरदार विरोध करताना सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी नाटेकर मारहाण प्रकरणातील शिक्षेसंदर्भात पाशेको यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविले असल्याचे सांगताना, माजोर्डा कॅसिनो प्रकरणातील अन्य एक संशयित मॅथ्यूवर न्यायालयात गैरहजर राहात असल्याबद्दल यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट बजाविल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. (प्रतिनिधी)