शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 15:55 IST

CoronaVirus News: दिल्लीत पोस्टर प्रकरणात पोलिसांकडून १७ जणांना अटक; राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २१ एफआयआर दाखल केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. यापैकी काहींना जामीन मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीदेखील तेच पोस्टर शेअर केलं आहे. त्यामुळे आता यावरून वातावरण तापलं आहे.मलादेखील अटक करा, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबत राहुल यांनी वादग्रस्त पोस्टरचा फोटोदेखील ट्विट केला आहे. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलं आहे. पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारणारं पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांनी कलम १८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.प्रकरण नेमकं काय?दिल्लीतल्या विविधा भागांमध्ये पोस्टर लावण्यात आल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना मिळाली. मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांसाठीच्या लसी परदेशांत का पाठवल्या? असा मजकूर त्या पोस्टरवर होता. हे पोस्टर कुठे छापण्यात आले, कोणाच्या सांगण्यावरून ते दिल्लीत लावले गेले, याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली, मध्य दिल्ली, रोहिणी आणि द्वारका परिसरात हे पोस्टर लावण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी