शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर आरोपींना मुक्त करा! कारणे न देता केलेली अटक अवैध; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:07 IST

ही औपचारिकता नसून अनिवार्य घटनात्मक प्रक्रिया, पूर्तता नसल्यास आरोपींना मुक्त करा, कोर्टाचे आदेश

डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - अटकेचे कारण समजणे घटनेच्या अनुच्छेद २२(१) नुसार अटक केलेल्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे.  रिमांडच्या वेळी याच्या पूर्ततेची खात्री करणे दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे अटकेचे कारण न दिल्यास ती अवैध ठरते, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

विहान कुमारला १० जून २०२४ रोजी फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने अटक करताना त्यामागची कारणे लेखी दिली नाहीत म्हणून ही अटक बेकायदेशीर ठरविण्याची विहान कुमारची मागणी फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाचे  न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि एन. कोटीश्वर सिंग यांनी या विरोधातील अपील मान्य करून अटक बेकायदेशीर घोषित केली. सुप्रीम कोर्ट म्हणाले, अटकेची माहिती व कारणे कळविणे औपचारिकता नसून अनिवार्य घटनात्मक आवश्यकता आहे.

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?१. अटकेचे कारण आरोपीला समजेल त्या भाषेत दिले पाहिजे.२. आरोपींनी याचे पालन न केल्याचा आरोप केल्यास अनुपालन सिद्ध करण्याची जबाबदारी तपास अधिकाऱ्यांवर आहे. ३. अटक केल्याची माहिती आणि अटकेची  कारणे वेगवेगळी द्यावी.  तपास अधिकाऱ्याला दोन्हींचे पालन करणे बंधनकारक आहे. 

भंग झाल्यास काय ?आरोपीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरते. व्यक्तीची अटक आणि पुढील रिमांड आदेश बेकायदा ठरतात. तपास, चार्जशीट आणि खटला बेकायदा ठरत नाही. परंतु, आरोपपत्र दाखल केल्याने अटक वैध ठरत नाही.

दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य रिमांडसाठी हजर करताना अनुपालन झाल्याची खात्री करापालन नसल्यास आरोपींना सोडण्याचे आदेश देणे. जामीन मंजूर करण्यावर वैधानिक निर्बंध असले तरी या कारणास्तव जामीन मंजूर करता येईल. 

हे दडवणे बेकायदाअटक केलेल्या व्यक्तीचे मित्र, नातेवाईक किंवा नामनिर्देशित व्यक्तींना अटक आणि आरोपीना कोठे ठेवण्यात आले आहे, याची माहिती न देणे घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.  यामुळे अटक बेकायदेशीर ठरते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक