शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:38 IST

Haryana Crime News: हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले.

हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले. पूरन कुमार यांनी जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून वरिष्ठांवर गंभीर आरोप केले होते. तर संदीप कुमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि व्हिडीओमधून पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली आहे. तसेच आता संदीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी केली आहे.

एएसआय संदीप कुमार हे रोहतक जिल्ह्याच्या सायबर सेलमध्ये तैनात होते. त्यांनी आज टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं होतं. संदीप यांच्या मृत्युमुळे कुटुंबीय आणि स्थानिकांना धक्का बसला आहे. संदीप कुमार यांनी दबावाखाली येऊन जीवन संपवल्याने त्यासाठी पूरन कुमार यांची पत्नी आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. जोपर्यंत पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांना अटक केली जात नाही तोपर्यंत संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

हरयाणामधील जींद जुलाना परिसरात राहणाऱ्या संदीप यांचे चुलत भाऊ शिशपाल आर्य यांनी सांगितले की, पूरन कुमार यांची पत्नी आणि समर्थकांवर  तत्काळ केस दाखल केली गेली पाहिजे. त्यांना अटक केल्याशिवाय आमच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही. संदीप यांनी जीवन संपवल्याचं आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावर दबाव आणून त्यांना जीवन संपवण्यास भाग पाडण्यात आलं आहे. जर संदीप यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली असेल, तर धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेल्या किमान ५-७ जणांना त्यांनी लक्ष्य केलं असतं. पण असं झालं नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही आहे, असा आमचा संशय आहे, असे त्यांनी सांगितले.

एएसआय संदीप कुमार हे जींदमधील जुलाना येथील रहिवासी होते. मात्र गेल्या एक वर्षापासून ते रोहतक येथील सायबर सेलमध्ये तैनात होते. मात्र आता त्यांचं अचानक निधन झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी