शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:44 IST

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे, असे सांगितले.

अग्निपथ योजनेवरून देशभरात वातावरण संतप्त झालेले असताना सैन्य दलांनी ही योजना मागे घेणार नाही, अशी घोषणा केली आहे. अग्निपथ ही योजना आजची नाही, तर या योजनेचा विचाक १९८९ मध्येच करण्यास सुरुवात झाली होती. ही योजना लागू करण्यासाठी परदेशातील सैन्यातील नियुक्त्या आणि तेथील एक्झिट प्लॅनबाबत पूर्ण अभ्यास करण्यात आला आहे, असे डीएमएचे अतिरिक्त सेक्रेटरी अनिल पुरी यांनी सांगितले. 

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे. तरुणच सर्वाधिक जोखिम घेऊ शकतात हे आम्हालाही माहिती आहे. 

सध्याच्या जवानांना जे जे काही मिळते ते सर्व अग्निपथच्या अग्निवीरांना देण्यात येणार आहे. सेवा शर्तींमध्ये त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सैन्याचे जवान जे कपडे घालतात तेच त्यांनाही दिले जाणार आहेत. सैन्याचे जवान ज्या मेसमध्ये जेवण, नाश्ता करतात तिथेच त्यांनाही मिळेल. जवानांसोबतच हे अग्निवीर राहणार आहेत, असेही पुरी यांनी सांगितले. 

चार पाच वर्षांत ५० ते साठ हजार सैनिक भरले जाणात आहेत. भविष्यात ही संख्या ९०००० ते १ लाख पर्यंत वाढविण्यात येईल. ४६००० अग्निवीरांची भरती ही विश्लेशन करण्यासाठी आम्ही उचललेले पहिले पाऊल आहे, असे ते म्हणाले. अग्निपथ योजना मागे घेण्याची कोणतीही शक्यता लष्कराने फेटाळून लावली आहे. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असे लष्कराने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कोचिंग संस्था विद्यार्थ्यांना चिथावणी देत ​​आहेत, असे लष्कराने आपल्या महत्त्वपूर्ण निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवान